पिंपरी (Pclive7.com):- सध्या तरुणांमध्ये आयटी क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. आयटी क्षेत्रात नक्किच चांगले करियर असून जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये यावे असे मार्गदर्शन सौ. सीमा येलमार यांनी केले.

येलमार समाजातील युवक आणि युवतींसाठी पुण्यामध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अभियंता विनय येलपले, उद्योजक कल्पेश अंपळकर, अमोल येलमार, लखन येलमार, दत्ता विभुते, विटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

येलमार समाजातील युवक युवती मोठ्या संख्येने पुणे शहरात वास्तव करत आहेत. नोकरी, शिक्षणाच्या माध्यमातून शहराच्या अनेक भागात विखुरले गेले आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र आणून, नोकरी आणि व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास 130 हून अधिक युवक युवतीने सहभाग नोंदविला.
यावेळी समाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती साठी सर्वानी एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज असल्याचे समोर आले. व्यवसाय, नोकरी, दहावी, बारावी नंतर काय यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.

सीमा येलमार पुढे म्हणाल्या, समाजातील तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नोकरी, व्यवसाय करत असताना एकमेकांच्या मदतीची मोठी गरज असते. एकत्र येऊन मोठे व्यवसाय उभा राहू शकतात. त्यामुळे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. याच सोबत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आजची गरज निर्माण झालेली आहे.
यावेळी अखिलेश येडरावकर, हर्षवर्धन येलमार, भारत लाडे, तुषार खळगे, माधुरी चौगुले-लाडे यांचा सत्कार करण्यात आला. समाजातील अनेक तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देणार्या लखन येलमार, दत्ता विभुते, सारंग गिद्दे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाधान उलभगत, सागर येडरावकर, प्रविण विटेकर यांनी अथक परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group