पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील रेल्वे महामार्ग लगत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इको जॉगिंग ट्रॅक’ची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याठिकाणी जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. तरी या जॉगिंग ट्रॅक ची तातडीने स्वच्छता तसेच उपाययोजना करावी अशी मागणी मावळ लोकसभा युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी केली आहे.

राजेंद्र तरस यांनी यासंदर्भात महापालिका उद्यान विभागाला निवेदन तरी आहे त्यात म्हटले आहे की, रावेत या ठिकाणी रेल्वे महामार्ग लगत महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत टॉयलेट बांधलेले असून त्या बाजूला इको जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. येथील झाडांची निगा महापालिकेच्या मार्फत राखलेली नसून नव्याने अनेक वृक्ष त्या ठिकाणी लागवड केलेली आहेत. परंतु त्या भोवती खूप मोठ्या प्रमाणात जंगली गवत आलेले आहे. त्यामुळे या वृक्ष लागवड केलेल्या वृक्षांची वाढ होताना दिसत नसून तरी त्या ठिकाणी जंगल झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी महापालिका हा इको जॉगिंग ट्रॅक वेळोवेळी त्याची मशागत करताना दिसत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी खूप दुरावस्था झालेली असून या ठिकाणी लवकरात लवकर सर्व साफसफाई करावी.

त्याचप्रमाणे उद्यान विभागामार्फत येथे पूर्णवेळ सुरक्षारक्षक उपलब्ध करावा, जेणेकरून त्या ठिकाणी कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत. आता सध्या याठिकाणी कोणीही सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक गैरप्रकार होत असून त्यातून कोणतेही गैर कृत्य झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल? तरी महापालिका उद्यान विभागाकडून लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात यावा अशी मागणी राजेंद्र तरस यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group