
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख परिसरातील मानाचा पहिला गणपती श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे जल्लोषात आगमन झाले. मंडळाचे हे ६९ वे वर्ष आहे. मंडळाची स्थापना १९५६ साली झाली. यंदा मंडळाने विद्युत रोषणाई हा देखावा आकर्षक देखावा सादर केला आहे.

या सोहळ्या वेळी मंडळाचे आधारस्तंभ पृथ्वीराज प्रभाकर साठे (सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी), मंडळाचे अध्यक्ष दिनेशदादा टकले, उपाध्यक्ष ऋषिकेश रामचंद्र साठे, कार्याध्यक्ष ऋषिकेश शंकर तांदळे, उत्सव प्रमुख, संकेत रतिकांत साठे, सचिव आकाश बाळासाहेब साठे, सभापती पंडितराव साठे, अर्जुन साठे, ओम टकले, सिद्धेश गट्टे, रोहन साठे, विशाल साठी, अद्विक तापकीर सुशांक साठे मंडळाचे कार्यकर्ते मान्यवर वर्गणीदार, हितचिंतक उपस्थित होते.

मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने भरलेल्या वातावरणात बाप्पाचे आगमन झाले. स्वागत मिरवणुकीत वीर शंभूराजे ढोल ताशा पथक चिमळी यांनी सर्वांचा उत्साह वाढला. ढोल ताशाच्या तालावर भक्तांनी बाप्पाला वंदन केले आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात वातावरण भक्तीमय झाले.

लक्षवेधी बाब म्हणजे मंडळाचे ६९ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. सहा दशकावून अधिकाळ पिंपळे निलखमध्ये सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमांमध्ये योगदान देणारे हे मंडळ आहे. आजही परिसरातील गणेश भक्तांसाठी एक विश्वासाचे व आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

मंडळाचे विसर्जन ७ व्या दिवशी मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजता सुरू होईल. या विसर्जनांचे मुख्य आकर्षण १०१ ढोलच्या गजरात विघ्नहर्ता ढोल ताशा पथक हडपसर यांचे वादन होईल. तरी सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group