
पिंपरी (Pclive7.com):- पुना डिस्ट्रिक्ट ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेमध्ये साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या मधुरा खांबे व समृद्धी भोईर या ऍथलेट्सने प्रत्येकी दोन सुवर्णपदक आपल्या आपल्या इव्हेंट्समध्ये प्राप्त केली. या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे दि.२५ व २६ ऑगस्ट रोजी संपन्न झाल्या. मधुरा खांबेने लॉन्ग जंप व ट्रिपल जंप इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर समृद्धी भोईर हिने हॅपटथलोन व १०० मीटर हर्डल्स मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

या स्पर्धेमध्ये हर्षल कुमार याने ११० मीटर हर्डल्स व ४०० मीटर हर्डल्स या प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर राखी फरिदाले हिने थाळीफेक प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला. नंदिनी कासकर हिने भालाफेक प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला.

दरम्यान, मधुरा खांबे व समृद्धी भोईर या दोघींची निवड राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये झाली आहे. २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे या स्पर्धा होणार आहेत.

हे सर्व खेळाडू साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या गेले कित्येक वर्ष चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. संत तुकाराम क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी येथे ते नियमित सराव करत आहे. चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले गेले आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात अनेक बाहेरच्या जिल्ह्यातील खेळाडू चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत, त्यांनाही त्यांच्या जिल्ह्यात यश प्राप्त होत आहे.























Join Our Whatsapp Group