व्हिडिओ पहा..👇👇
https://www.instagram.com/reel/DOyTdhFEtJh/?igsh=Y3NlNG45NWFxZXlv
पिंपरी (Pclive7.com):- हातात कोयते घेऊन चोरट्यांनी घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. चिंचवडमधील एका सोसायटीत घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कोयता हातात घेऊन तीन चोरट्यांनी चिंचवडमधील सोसायटीत प्रवेश केला आणि दोन घरफोड्या करुन दागिने लंपास केले आहेत. सुदैवाने यावेळी घरी कोणी नव्हते, त्यामुळं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चिंचवडमधील मंगलशिल्प सोसायटीत रात्री साडे बाराच्या सुमारास कोयता घेऊन तीन चोरटे शिरले होते. सीसीटीव्हीत सुद्धा ही बाब कैद झाल्याचं दिसून येत आहे.

सोसायटी प्रवेश केल्यानंतर या चोरट्यांनी चौथ्या आणि सहाव्या मजल्यावरील फ्लॅट फोडले. फ्लॅटमध्ये प्रवेश करुन दागिने लंपास केले आहेत. नेमके किती दागिन्यांची चोरी झाली, याबाबतची माहिती चिंचवड पोलिसांकडून घेतली जात आहे. मात्र या घटनेने शहरातील सोसायट्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.























Join Our Whatsapp Group