
पिंपळे सौदागरसह ८४ सोसायट्यांचा ऐतिहासिक सहभाग; ३० हून अधिक समर्पित स्वयंसेवकांची ७ तास अथक सेवा
पिंपरी (Pclive7.com):- सप्टेंबर महिन्यातील पितृपक्ष हा पुण्यस्मरणाचा काळ, आणि याच काळात सेवा वर्धिनीच्या ‘एक मुठ्ठी अनाज’ अभियानाने अन्नदानाचा एक नवा सामाजिक विक्रम प्रस्थापित केला. पितृपक्षाच्या पुण्यपर्वात सेवा वर्धिनीच्या ‘एक मुठ्ठी अनाज’ अभियानात पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड आणि आसपासच्या उपनगरांतील नागरिकांनी अन्नदानाचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा सर्वपितृ अमावस्या आणि पितृ पक्ष यांचा अर्थपूर्ण योग जुळून आल्याने अन्नदानाचा हा संकल्प अधिकच महत्त्वपूर्ण ठरला.

या पवित्र काळात, सेवा वर्धिनीच्या ‘एक मुठ्ठी अनाज’ अभियानाने तब्बल १८,२७८ किलो धान्य संकलन करून, पुण्याचा अन्नवर्षाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला.

अभियानाचे स्वरूप आणि समर्पण..
या विक्रमी उपक्रमात परिसरातील ८४ सोसायट्यांतील ३३,००० कुटुंबांशी संपर्क साधण्यात आला. ७०० हून अधिक समर्पित सदस्यांनी सलग सात तास अखंड मेहनत घेतली. प्रत्येक सोसायटीतील निश्चित संकलन बिंदूंवर जाऊन धान्याचे वर्गीकरण, अचूक तौलनिक नोंदणी आणि टेम्पोमध्ये भरणा करण्याचे काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले. नेहमीप्रमाणेच, हे संपूर्ण संकलन डिजिटल स्वरूपात नोंदवले गेले असून, प्रत्येक सोसायटीला त्यांच्या योगदानाचा स्पष्ट अहवाल सादर करण्यात आला आहे.

गरजूंना थेट लाभ..
संकलित करण्यात आलेले हे धान्य अंबेडवे, दापोली आणि कुंबले येथील चार गरजू संस्थांमध्ये तातडीने पोहोचवण्यात आले. या अन्नदानाचा लाभ एकूण ३०५ अनाथ लाभार्थींना झाला आहे.

कार्यकर्त्यांची भावना..
या यशाबद्दल बोलताना अभियानाचे प्रमुख सदस्य भावूक झाले:
विनोद पाटील (अध्यक्ष): “पितृपक्षात केलेले अन्नदान हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर ते समाजप्रती कृतज्ञतेचा खरा भाव आहे.”
अभय बाविस्कर (सचिव): “अन्नदान ही आपल्या संस्कृती आणि करुणेचा मूलभूत आधारशिला आहे.”
अनिकेत देशमुख (सचिव): “पूर्वजांचे पुण्यस्मरण करताना गरजूंच्या ताटात अन्न पोहोचवणे, हेच आमच्यासाठी खरे ‘श्राद्ध’ आहे.”
केशव जोशी (सचिव ): “‘एक मुठ्ठी अनाज’ अभियानाने त्या पवित्र भावनेला हजारो हातांची साथ दिली आहे.”
अभिजित चौधरी (सचिव): “प्रत्येक सभासदाने समाजासाठी आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने जपली.”
विवेक विजय कासट (प्रचार प्रतिनिधी): “अन्नदान ही केवळ कृती नाही—ती एक भावना आहे. पितृपक्षात जेव्हा हजारो ओंजळ एकत्र आल्या, तेव्हा त्या समाजाच्या अंतःकरणातून उमटलेल्या प्रार्थना वाटल्या.”

सक्रिय सदस्यांचा सहभाग (Acknowledging Active Members)..
या अभियानाला यश मिळवून देण्यात खालील सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला:
प्रसाद पाडगावकर, नितीन भिरूड, विवेक विजय कासट, शिवराम लटपटे, संदीप गुंजाळ, शिवकुमार प्याती, संदीप काळे, नितीन साळवे, तुषार शाह, पुरुषोत्तम शेटे, विरल शाह, पुष्कर सरणीस, भागवत पाटील, माणिक सुद्रिक, चंदन चौरासिया, आनंद गुजराथी, शिखर श्रीवास्तव, विष्णूकांत पांडे, तरुण सिथा, गणेश पाटील, बाळकृष्ण मसलगेकर, सुभाष पाठक, नितीन चौधरी, अरविंद पारखी, अरविंद जाधव, संजय पाटील, रुपेश हेलवाडे, नकुल देशपांडे, चक्रधर बोरकुटे, सचिन देशपांडे, प्रतीक कुलकर्णी.

महाराष्ट्रात संवेदनेचा सामाजिक उत्सव..
या चळवळीने गेल्या ४ वर्षे ३ महिन्यांत एकूण २,३८,२९० किलो अन्नदान करत महाराष्ट्रात संवेदनेचा सामाजिक उत्सव निर्माण केला आहे. या हजारो ओंजळ नि केवळ अन्न दिले नाही, तर एकत्रितपणे समाजाच्या अंतःकरणात श्रद्धेची आणि करुणेची गाथा कोरली आहे. अभियानाच्या माध्यमातून गेल्या १,५३० दिवस पासून रोज ७८० निराधार मुले आणि वृद्ध पोटभर जेवण करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group