
निगडी (Pclive7.com):- मिलिंद नगर, सेक्टर २२ येथील मरीआई माता प्रतिष्ठानतर्फे दि.४ व ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कळस स्थापना व अन्नदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम होणार असून, परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी कळस स्थापना विधी होणार असून, दुसऱ्या दिवशी भव्य अन्नदान महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक सेक्टर २२, निगडी गावठाण, साईनाथ नगर आणि यमुनानगर या परिसरातून जाणार आहे.

या सोहळ्यास आजी-माजी नगरसेवक संगीता शाम पवार, बापू घोलप, सुलभा उबाळे, सचिन चिखले, उद्योजक तानाजी शिंदे, अक्षय कारंडे, गुरुबाई शिंगे, सविता फणेकर, शिवकांता नाटेकर, लक्ष्मीबाई आळंद, अभि शिंगे, राजु तांबोळी, गणेश उदयकर, रोहित सलादळी, आकाश नाटेकर, सिध्दार्थ होसमणी, आज्जु शिंगे, अजय नाटेकर ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिष्ठानतर्फे सर्व भाविक व नागरिकांना या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group