पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ (सर्वसाधारण पुरुष) येथील भाजप चंद्रकांत नखाते यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दत्तमंदिर, दत्तनगर, रहाटणी येथे होणार आहे.

माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, “चला शुभारंभ करूया, विजयाच्या प्रवासाचा!” या घोषवाक्यासह निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन, पारदर्शक कारभार, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक व नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत आणि नागरिकांचा विश्वास यांच्या बळावर हा प्रचार केवळ निवडणुकीपुरता न राहता प्रभागाच्या प्रगतीसाठी परिवर्तनाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाभिमुख, लोककेंद्रित आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
























Join Our Whatsapp Group