तळवडे (Pclive7.com):- पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १२ तळवडे–रूपीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी लाडक्या बहिणी मैदानात उतरले असल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भालेकर, शरद भालेकर, सौ. सीमा धनंजय भालेकर व सौ. चारुलता सोनवणे यांच्या परिचय पत्रकांसह पक्षाच्या वतीने आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती देणारी पत्रके नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. घरोघरी जाऊन थेट संवाद साधत मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

या प्रचाराला विशेष धार मिळाली आहे ती ‘लाडक्या बहिणी’ यांच्या सक्रिय सहभागामुळे. महिलांनी स्वतः मैदानात उतरून घराघरांत भेटी देत महिलांच्या समस्या, नागरी सुविधा, सुरक्षितता, पाणी, रस्ते, आरोग्य आणि सरकारच्या विविध योजनांबाबत थेट चर्चा केली. विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांना विश्वासात घेण्याचे काम त्या जोमाने करत आहेत.

हा प्रचार केवळ राजकीय स्वरूपाचा नसून विश्वास, आपुलकी आणि लोक सहभागाचा संदेश देणारा ठरत असल्याचे चित्र आहे. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग मिळाला असून, प्रभागात पक्षाची पकड अधिक भक्कम होताना दिसत आहे. महिला शक्तीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग १२ मध्ये आपला बालेकिल्ला कायम राखणार हे दिसून येत आहे.
























Join Our Whatsapp Group