पिंपरी (Pclive7.com):- बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाइट व व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ५५ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली.

या प्रकरणातील पोलिसांनी विविध मोबाइल क्रमांकधारक व बनावट बँक खातेदार अशा एकूण २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत शरद वैद्य (वय ४४, रा. रुणाल बहार, निगडी, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ५ जुलै २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी प्रशांत वैद्य यांना 1M8-Elite Trading Circle नावाच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. गुंतवणुकीवर खात्रीशीर नफ्याचे आमिष दाखवून बनावट वेबसाईटद्वारे ५५ लाख ८२ हजार रुपयांची गुंतवणूक करायला लावली. त्यावर १४ कोटी १९ लाख ९१ हजार ५०७ रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. फिर्यादी यांच्याकडे बँक चार्जेसच्या नावाखाली १९ लाख ८७ हजार ८८१ रुपयांची मागणी करण्यात आली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने गुंतवणूक केलेली रक्कम फ्रीज झाल्याचे सांगून आर्थिक फसवणूक करण्यात आली.

























Join Our Whatsapp Group