पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरपीआय (आठवले गट) भाजपसोबत निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आरपीआयला पाच जागा भाजपाने सोडल्या आहेत. तसेच हे सर्व उमेदवार ‘कमळ’ या चिन्हावर लढणार आहेत अशी माहिती आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत १२८ जागांपैकी पाच जागा आरपीआय आठवले गट लढणार आहे. ०१) प्रभाग क्रमांक ९ – कमलेश वाळके, ०२) प्रभाग क्रमांक २५ – कुणाल व्हावळकर, ०३) प्रभाग क्रमांक ३० – चंद्रकांता सोनकांबळे, ०४) प्रभाग क्रमांक २१ – मोनिका निकाळजे, ०५) प्रभाग क्रमांक १६ – धर्मपाल तंतरपाळे हे आरपीआयचे उमेदवार भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.























Join Our Whatsapp Group