पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ वाकड परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा शनिवार, दि.०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता म्हातोबा मंदिर, वाकड गावठाण येथून सुरू होणार आहे.

पिंपळे निलख, वाकड, कस्पटे वस्ती, विशाल नगर प्रभाग क्रमांक २६ चे भाजपा आरपीआय चे अधिकृत उमेदवार विनायक गायकवाड आरती चोंधे, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे यांच्या प्रचारार्थ या पदयात्रेचा शुभारंभ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपा पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक प्रमुख शंकरभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते होणार आहेत. या पदयात्रेमध्ये भाजपा व आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.

या पदयात्रेचा मार्ग म्हातोबा मंदिर वाकड गावठाण येथून वाकड चौक, उत्कर्ष चौक, सम्राट चौक, वेणु नगर, कावेरी नगर, पिंक सिटी रोड, म्हातोबा चौक, छत्रपती चौक, धनराज पार्क, पुन्हा छत्रपती चौक मार्गे मानकर चौक येथे समाप्त होणार आहे.

या पदयात्रेद्वारे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवणे, विकासकामांचा आढावा मांडणे तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उमेदवारांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group