पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड मधील प्रसिध्द उद्योजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया यांना ‘सिटीझन्स इंटीग्रेशन पीस इंन्स्टिट्युट’ (CITIZENX INTEGRATION PEACE INSTITUTE) या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘जीवनगौरव पुरस्कार’ ‘(LIFE TIME ACHIEVEMENT AWARD)’ देऊन गौरव करण्यात आला.
बेंगलोर मधील व्हाईट हाऊस हॉल येथे रविवारी (दि. २२ जुलै) ‘राष्ट्रीय एकता आणि औद्योगिक वाढ’ (National Unity & Industral Growth) या कार्यक्रमात माजी केंद्रिय मंत्री एम्.व्ही.राजशेखरण यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन वालिया यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुशरफ अहमद खान, कर्नाटकचे माजी मंत्री मल्लीक्या व्ही. गुट्टेदार आणि राज्यसभेचे खासदार डॉ. एम्. रामाजॉईस आदी उपस्थित होते. राजेंद्रसिंह वालिया हे पंजाबी कला केंद्र, पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ह्युमन राईट कौन्सिल ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, उद्योग व राजकारण क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांना ’जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group