पिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्लू’मुळे चिखली येथील ४८ वर्षीय महिलेचा तर निगडी येथील ४१ वर्षीय पुरूषाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्वाईन फ्लू’ने तब्बल ८ बळी घेतले असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिलेला दि.२७ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर निगडी येथील पुरूषाला २८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या दोघांनाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. अखेर उपचारा दरम्यान आज या दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून बळींची संख्या ९ वर पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने आपला विळखा चांगलाच आवळला आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group