पुणे (Pclive7.com):- देशभरात नावलौकिक मिळवलेल्या पुणे फेस्टिवलचा शुक्रवारी मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला. दिपप्रज्वलन करुन गणेश वंदनेने फेस्टिवलचे उद्घाटन झाले. फेस्टीवलचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर कलाकारांनी शानदार परफॉर्मन्स सादर केले. हिंदीतील नव्या-जुन्या गाण्यांवरील सादरीकरणाला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली.
यावेळी मान्यवरांना पुणे फेस्टिवल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना हेमा मालिनी यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत भाषणाला सुरुवात केली. तसेच तीस वर्षांपासून फेस्टिवलमध्ये नृत्य करत आहे, मात्र आज प्रमुख पाहुणी आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची बाब असून पुढच्या वर्षी कला सादर करेल असे त्या म्हणाल्या.






















Join Our Whatsapp Group