मुंबई (Pclive7.com):- महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमीत्त सर्वसामान्यांपासून ते राजकीय स्तरावरून बापूंना अभिवादन केले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या खास शैलीत व्यंगचित्र काढून गांधीजींना अभिवादन केले. राज ठाकरेंनी उपहासात्मक व्यंगचित्र काढले आहे.
व्यंगचित्रात बापूच्या वेशात पंतप्रधान मोदींना चरख्यावर सूत कातताना दाखविले आहे. नेहमीप्रमाणे अमित शाह त्यांच्या बाजूला बसलेले आहेत. नरेंद्र मोदी चरख्यावर कातत असलेले सूत देशातील सर्वसामान्य लोकांच्या अंगावरील कपड्याचे आहे. बाजूलाच मोदींनी दिलेल्या ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाचे बॅनर पडले आहे. कातलेल्या सूतावर आर्थिक आणि वैचारिक गोंधळ लिहिले आहे.
व्यंगचित्रात राज यांनी मोदींना सध्याचे गांधी बनविले आहे. कुटीवर बापूचे छायाचित्र लावले आहे आणि समोर असलेल्या परिस्थितीकडे बापू हतबलरितीने बघत आहेत. राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणेच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केले आहे.