पिंपरी (Pclive7.com):- भूतांची भिती दाखवून एका चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
याबाबत मुलीच्या पित्याने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या ‘काका’ने चार वर्षीय मुलीला भूताची भीती दाखवून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने नेले. त्यानंतर तिला मारहाण करून लैंगिक अत्याचार केले. घरी आल्यावर कुठे होती अशी विचारणा तिच्या पालकांनी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेत मुलगी जखमी झाल्याने तिला वायसीएम रुग्णालयात नेले. मात्र लैंगिक अत्याचाराचा प्रकार लक्षात येताच तिला पुढील तपासणी करिता ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये लहान मुलींवरील लैंगिक अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांनी याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






















Join Our Whatsapp Group