पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर दिगंबर जैन समाजाच्यावतीने शिवांता हॉल पिंपळे सौदागर येथे सामूहिक क्षमावाणी पर्व २०१८ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपळे सौदागरमधील २५० जैन बांधव उपस्थित होते. यावेळी शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते गणेशोत्सव काळात दिगंबर जैन समाज पिंपळे सौदागर मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा कार्यक्रमांमधील विजयी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
यावेळी दिगंबर जैन समाज पिंपळे सौदागर सदस्य रितेश जैन, मनीष जैन, राहुल जैन, सौरभ जैन, रोहित राफन व इतर मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group