पिंपरी (Pclive7.com):- पुणे यांची जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी नामनिर्देशित केलेले सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
डॉ. ए.बी. नांदापुरकर (जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे व सदस्य सचिव जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती) यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नाने ही निवड झाली आहे.