पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या कला गुणांना व संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी वाव मिळावा, तसेच किल्ला बनवत असताना किल्यांची संपूर्ण माहिती व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ४५ मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. निवडक स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. तर उर्वरित स्पर्धकांनाही प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते प्रथम क्रमांक दीपमाला सोसायटीतील सेसा स्पार्कल्स यांना देण्यात आला. यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती. द्वितीय क्रमांक रोज आयकॉन सोसायटीतील मयंक लड्डा यांनी पन्हाळगडाची प्रतिकृती साकारली होती. तर तृतीय क्रमांक विजेते वेदांत काटे यांनी भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती, अशा तीन स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले.
या स्पर्धेकरिता अनेक मुला-मुलींनी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. हे किल्ले बनविण्यासाठी दगड, माती, विटा, अशा पारंपारिक साधनांचा वापर करून किल्ले साकारण्यात आले होते.
मुला-मुलींना आपल्या राज्यातील किल्ल्याची माहिती व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील संघटन कौशल्यास प्रोहत्सान मिळावे यासाठी अशा स्पर्धा आयोजित करणे काळाची गरज असल्याचे उन्नती फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group