पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महामानव भारतरत्न डाॅ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकातील डाॅ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास व संविधानाच्या प्रास्ताविकाच्या कोनशिलेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्याक्ष गौतम आरकडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासिर चौधरी, शहर सरचिटणीस गौरव चौधरी, अनिकेत आरकडे तसेच अक्षय सोनपारखे, पांडूरंग वीर, विशाल कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group