पिंपरी (Pclive7.com):- काळभोर नगर परिसरातील भुयारी मार्गात एका कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार भुयारी मार्गातून जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ कार बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group