खास महिलांसाठी “रजनीगंधा” हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम; नगरसेवक विनोद नढे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी येथे ‘विरांगणा महिला महासंघ’ उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने खास महिलांसाठी “रजनीगंधा” या मराठी व हिंदी गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन नगरसेवक विनोद नढे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दि.०४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत नगरसेवक विनोद नढे जनसंपर्क कार्यालय, पवना चौक, नढेनगर, काळेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात नारीशक्तीचा गौरव करत विविध बचत गटांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच कला, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.

कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे “रजनीगंधा” ही संगीत मैफल असून, मराठी व हिंदी गीतांच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण भारावून जाणार आहे. याशिवाय, सायंकाळी ८ ते १० या वेळेत उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रेरणादायी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला काळेवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या सन्मानाचा आणि कलात्मकतेचा उत्सव अनुभवावा, असे आवाहन विरांगणा महिला महासंघच्या संस्थापक प्रियांका विनोद नढे आणि नगरसेवक विनोद नढे यांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group