पिंपरी (Pclive7.com):- खरोशी (ता.खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खरोशी गावठाण तसेच धारेवाडी,शेरेवाडी, अंगणवाडी विद्यार्थ्यांना महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत स्वर्गीय अजिंक्य आण्णा निवृत्ती खिरीड सोशल फाऊंडेशन मोशी-पुणे यांच्या सौजन्याने वाढदिवसाच्या स्मृतीस आठवणींना उजाळा देण्याचे उद्देशाने शालेय शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

आदिवासी डोंगराळ अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी या अनुषंगाने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय अजिंक्य आण्णा खिरीड यांचे अल्पशा आजाराने दोन महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे कार्य विशेषतः ग्रामिण भागात स्व.अजिंक्य आण्णा खिरीड सोशल फाउंडेशन मोशी व त्यांचे युवा मित्र मंडळ करत आहेत.

स्तुत्य कार्यक्रमाच्या निमित्त बालचमुंच्या हस्ते स्व.अजिंक्य आण्णा खिरीड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बालचमूच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यां बरोबर केळी, ज्युस यांचे वाटप करून समारोप करण्यात आला.

यावेळी मा.सरपंच सामाजिक कार्यकर्ते भोलेनाथ कौदरे, विजय कौदरे, सुदाम सुपे सर, शिक्षिका शितल मुसमाडे मॅडम तसेच विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. या प्रसंगी खरोशी गावच्या सरपंच रोहिणी लांघी, समाज भूषण पुरस्कार प्राप्त मा.सरपंच भोलेनाथ कौदरे, ग्रा.पं.सदस्या आशा कौदरे, भीमाशंकर देवस्थान पुजारी विजय कौदरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन कौदरे, उपाध्यक्ष विजय कौदरे, शेरेवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक लांघी,

स्व.अजिंक्य आण्णा खिरीड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील शेठ खिरीड, उपाध्यक्ष केदारशेठ गव्हाणे, शालेय शिक्षक सुदाम सुपे, सुषमा भोये,धारेवाडीचे शालेय शिक्षक एस.एम.बांबळे, शेरेवाडीच्या शालेय मुख्याध्यापक शिक्षिका शितल मुसमाडे, अंगणवाडी सेविका जनाबाई शेलार, शेरेवाडी सेविका सविता शेलार, महेश कांबळे.

ओंकार जुनवणे, विकास आंधळकर, वैभव सातपुते, अजित थिगळे, शुभम बनकर, अमोल मुसळे, योगेश यादव, समीर खुडे, सागर रोकडे, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरोशी गावातील पालक माता पिता बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सुदाम सुपे सर यांनी तर सुत्रसंचालन आभार शितल मुसमाडे मॅडम यांनी मांडले.



















Join Our Whatsapp Group