पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावातील सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघेरे यांचे आज (दि.१७) अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुनिता वाघेरे यांचे ते पती होते. दोन दिवसांपूर्वी राजेश वाघेरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने चिंचवड येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज दुपारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरीगावातील स्मशानभूमीत आज रात्री ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
पिंपरीगावातील सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघेरे यांचे निधन





















Join Our Whatsapp Group