पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात नंदकुमार कांबळे, विनायक कदम आणि सचिन शेटे आयोजित विविध भारती म्युझिकल इव्हेंटच्या माध्यमातून “पिया तू अब तो आजा” हा हिंदी-मराठी सुमधुर गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी प्रसन्ना वंजारी, प्रीतम वंजारी, मंगेश सोनवणे, विलास गाधडे, मोहन भस्मे, आयोजिका मोहिनी जाधव, विकास जगताप, मल्लिकार्जुन इंगळे, ऋचा गांगल, निळकंठ निमगावकर, राजेंद्र शिंदे, परमेश्वर घाडगे, मुकेश चौधरी, नेहा चौधरी, फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब अध्यक्ष वसंत ठोंबरे, रंजनाताई ठोंबरे, जयसिंग कांबळे, विश्वास सोहनी, वंदनाताई सोहनी, पोलिस उप निरीक्षक संतोष माळी, गणेश लोढ, प्रकाश पवार, प्रकाश येवला व आदी मान्यवर उपस्थित होते.

“पिया तू अब तो आजा” या कार्यक्रमात नंदकुमार कांबळे, विनायक कदम, राजेंद्र पगारे, चंद्रकांत हिवरकर, शैलेंद्र पाटील, उत्तम जाधव, शुभांगी पवार, नेहा दंडवते, डॉ. आरोही पाटे, डॉ. संदीप गायकवाड, स्वाती पाटील, अनिल जंगम, पंकज कथलकर आणि डॉ. कविता बोंडे या गायक-कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात हिंदी व मराठी गीते सादर केली. रसिक श्रोत्यांनी प्रत्येक गीताला उत्स्फूर्त दाद देत अनेक गाण्यांना “वन्स मोअर”ची मागणी केली.
‘चांदणे शिंपीत जा’, ‘धुंदीत गाऊ’, ‘फिटे अंधाराचे जाळे’ या मराठी गीतांसह ‘पिया तू अब तो आजा’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘जीना क्या अजी प्यार बिना’ यांसारखी गाजलेली गीते सादर करण्यात आली.

विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे स्वर्गीय आशाताई भोसले यांनी गायलेले “ये मेरा दिल प्यार का दिवाना” हे गीत गायक अनिल जंगम यांनी महिला आवाजात सादर केले. त्यांच्या या अनोख्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून टाळ्यांची दाद दिली. दृकश्राव्य कराओके गाण्यांच्या या प्रेक्षकांसाठी विनामूल्य असलेल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग सौमिल घावटे यांनी तर ध्वनी व्यवस्था शैलेश घावटे आणि व्हिज्युअल व्यवस्था विक्रम अंबिके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा दंडवते आणि अरुण सरमाने यांनी केले. तर सचिन शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















Join Our Whatsapp Group