पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयोजित ‘सीएम’ चषक चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका निर्मलाताई कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, स्वीकृत नगरसदस्य संदीप नखाते यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते.

रविवार दि.२३ डिसेंबर रोजी गोविंद चौक येथील लिनीअर अर्बन गार्डन येथे ही चित्रकला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये लहान मुलांसोबत पालकांनी देखील आपला सहभाग नोंदवला होता. यावेळी मुलांनी बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्रीभ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, निसर्गचित्र या समाज जागृती करणाऱ्या विषयांवर चित्र रेखाटन केले. यावेळी नियोजकांकडून मुलांना चित्रकलेचे उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. सदर स्पर्धेत सुमारे २०० मुलांनी सहभाग नोंदवला.
तसेच पिंपळे सौदागर येथील पृथ्वीराज मंगल कार्यालय येथे ‘सीएम’ चषक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला दोखील मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांनी बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्री भ्रूण हत्त्या, भाजप सरकार योजना, लेक वाचवा लेक शिकवा, आर्थिक दारिद्र्य-सामाजीक समस्या, पृथ्वी वाचवा अशा समाजिक विषयांवर स्पर्धकांनी उत्कृष्ठ रांगोळी काढल्या. यावेळी नियोजकांकडून सहभागी महिलांना पेनचे वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धकांना अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अक्षय घोळवे, विनोद तापकीर, संतोष अढाघळे यांनी काम पाहिले.
यावेळी संजय कुटे, जगन्नाथ काटे, कुंदाताई भिसे, भोलाशेठ काटे, राजेश पाटील, संतोष सिंग, वैजंतीमाला सावंत, कांचन काटे, नितीन कुंजीर, श्याम कुंजीर, कैलास कुंजीर, संकेत कुटे, सावंत ताई, सुप्रिया पाटिल, राजेश पाटिल, संतोष सिंग व रोहिदास गवारे हे मान्यवर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group