पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने नागरिकांच्या वाहतूक विषयक तक्रारी व समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘ट्रॅफिक बडी’ ऑनलाइन व्हॉट्सॲप चॅटबॉट उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जून २०२६ या एका महिन्यातच या चॅटबॉटच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या १,६३८ तक्रारींचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक कोंडी, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच इतर वाहतूक विषयक समस्यांबाबत नागरिकांना थेट तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांकडे प्रत्यक्ष जाण्याऐवजी नागरिकांना घरबसल्या व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदविता यावी, यासाठी ८७८८६४९८८५ हा ट्रॅफिक बडी चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायक्त विक्रांत देशमुख नयांनी गरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक कोंडी, नियमभंग किंवा इतर वाहतूक विषयक अडचणींबाबत तक्रार नोंदविण्यासाठी ट्रॅफिक बडी चॅटबॉटचा जास्तीत जास्त वापर करावा.





















Join Our Whatsapp Group