पिंपरी Pclive7.com):- जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय हँडबॉल स्पर्धा 2026 चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पिंपरी येथील एच.ए. स्कूलमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका सौ. दर्शना कोरके उपस्थित होत्या. तसेच उपमुख्याध्यापक श्री. माने पी. जे., पर्यवेक्षिका सौ. मनीषा कदम, क्रीडा अधिकारी दीपक कणेरे सर, मार्गदर्शक श्री. मुकेश पवार सर, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू चंद्रशेखर कुदळे तसेच राम हराळे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा देत शिस्त, संघभावना आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडवले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, पंच, स्वयंसेवक आणि आयोजकांचे मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



















Join Our Whatsapp Group