
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूल, पिंपरीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात एच. ए. स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना कोरके तसेच उपमुख्याध्यापक पोपट माने यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत अधिक जोमाने सराव करून राज्यस्तरावरही यश मिळवण्याचे आवाहन केले.

या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक मुकेश पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत ही उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


















Join Our Whatsapp Group