पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालयातील PICU विभागात उपचार घेत असलेल्या ११ महिन्यांच्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणातील संपूर्ण वैद्यकीय कागदपत्रे आणि सविस्तर वैद्यकीय अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन दिले आहे.

कु. पर्णवी सचिन रजत या बालिकेवर वाय.सी.एम. रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (PICU) उपचार सुरू होते. २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.०५ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या Medical Certificate of Cause of Death नुसार मृत्यूचे तात्काळ कारण “Pulmonary Hemorrhage due to MODS with DIC with Fluid-Refractory Shock and ? Viral Encephalopathy” असे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर बालिकेवर नेमके कोणते उपचार करण्यात आले, उपचारांची प्रक्रिया काय होती आणि उपचारादरम्यान कोणत्या वैद्यकीय तपासण्या व औषधोपचार करण्यात आले, याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय अभिलेखे उपलब्ध करून देण्याची मागणी नढे यांनी केली आहे.

यामध्ये Emergency/Casualty Admission Notes, PICU मधील दैनंदिन उपचार नोंदी, डॉक्टरांच्या प्रोग्रेस नोट्स, नर्सिंग चार्ट्स, सर्व पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी तपासण्यांचे अहवाल, Blood/CSF व Viral Markers अहवाल, देण्यात आलेली जीवनरक्षक औषधे, IV Fluids व Blood Products यांच्या नोंदी, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञांचा Case Summary, Complete Indoor Case Sheet/IPD File तसेच Death Summary यांच्या प्रमाणित प्रती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित सर्व अधिकृत वैद्यकीय अभिलेखे नातेवाईकांना आणि संबंधितांना विनाविलंब उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी विनोद नढे यांनी आयुक्तांकडे केली आहे.



















Join Our Whatsapp Group