वाकड (Pclive7.com):- जनसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना विविध शासकीय योजना व आवश्यक सुविधांचा लाभ सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांपासून विविध ठिकाणी ‘जनकल्याण शिबिरां’चे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विविध योजनांसोबतच कलाटे यांच्यावतीने मोफत NCMC कार्डसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी राहुल कलाटे जनसंपर्क कार्यालय, वाकड येथे विशेष ‘लाभार्थी शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जनकल्याण शिबिरातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत तसेच राहुल कलाटे यांच्या वतीने आयोजित या शिबिराच्या डॅशबोर्डचे देखील अनावरण केले जाणार आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमातून नागरिकांना शासकीय योजना व लोककल्याणकारी सुविधांचा लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जनतेच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता त्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही आणि सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे कलाटे यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले आहे.

राहुल कलाटे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित जनकल्याण शिबिरांमध्ये आतापर्यंत ६४ पेक्षा जास्त शिबिरे घेण्यात आली असून, ८,५०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेल्या या जनसेवेच्या उपक्रमाला पुढेही अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचे राहुल कलाटे यांनी सांगितले आहे.
कार्यक्रम तपशील :
📍 स्थळ: राहुल कलाटे जनसंपर्क कार्यालय, वाकड
📅 दिनांक: मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ८.३० वाजता
⭐ प्रमुख उपस्थिती: रविंद्र चव्हाण, प्रदेश अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र आणि सहकारी.


















Join Our Whatsapp Group