पटनी हे गेल्या २० वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सक्रिय सहभागी आहेत. पक्षाचे कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम आणि भाजपा परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या कार्यात त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. शहरातील राजस्थानी, मारवाडी आणि हिंदीभाषिक समाजातील विविध घटकांशी त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व ४८३ बूथवर सलग चार महिने शंभर टक्के यशस्वी आयोजन करण्यासाठी पटनी यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी समन्वय साधून कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांनी योगदान दिले.
पटनी यांच्या नियुक्तीबद्दल आमदार महेश लांडगे यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दोन दशकांतील त्यांची साथ, नि:स्वार्थ पक्षकार्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले आत्मीय संबंध मोलाचे आहेत. त्यांच्या निष्ठेला आणि समर्पित कार्याला पक्षश्रेष्ठींनी योग्य न्याय दिल्याची भावना लांडगे यांनी व्यक्त केली. पटनी यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा शहरातील पक्षसंघटनाला लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीनंतर पटनी यांनी पक्षनेतृत्व, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि सहकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकासजी डोळस, मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे, नगरसेवक उदय गायकवाड, नगरसेवक सागर गवळी आणि सहकारी उपस्थित होते पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षसंघटन बळकट करणे, समाजातील विविध घटकांशी संवाद वाढवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणे याला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपाच्या सरचिटणीसपदी माझी नियुक्ती करून पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. आमदार महेशदादा लांडगे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ माझ्यासाठी मोलाचे आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्नजी काटे, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी निष्ठेने पार पाडेन. पक्षसंघटन अधिक बळकट करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करणे याला माझे प्राधान्य राहील. माझ्यावर दाखवलेला विश्वास समर्पित कार्यातून सार्थ ठरवेन.”
– संजय पटनी, सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपा.


















Join Our Whatsapp Group