पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडच्या मोहन नगर परिसरातील एका सर्व्हिस सेंटरमधून सुमारे ९ लाख ८६ हजार रुपयांच्या किमतीच्या दुचाकीच्या बॅटऱ्या व इलेक्ट्रिक मोटर चोरी केल्याप्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालक आणि एका भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्वाती मनीष मोहिते (वय ४६, रा. भक्ती शक्ती अपार्टमेंट, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार, डिसेंबर २०२५ पासून ते १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मोहननगर, चिंचवड येथील जय मातादी सर्व्हिस सेंटर येथे ही घटना घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये ट्रेनिंगच्या निमित्ताने काम करणाऱ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने ९ लाख ८६ हजार रुपये किमतीच्या ईव्ही टुव्हिलरच्या बॅटऱ्या व ईव्ही मोटर चोरून नेल्या. त्यानंतर हा माल चिखलीतील एका भंगार व्यावसायिकास विकले आहे.
या प्रकरणी संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप दोन्ही संशयितांना अटक करण्यात आलेली नसून पोलीस पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे हे करत आहेत.



















Join Our Whatsapp Group