पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने उल्लेखनीय कामगिरी करत दोन घरफोडी आणि दोन वाहनचोरी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्तालय हद्दीत ६ ऑक्टोबर रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले आणि त्यांच्या पथकाने संशयित आरोपी रुषिकेश राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) व अशोक राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून एमएच १३ सीए ८६२८ आणि एमएच १४ बीडब्ल्यू ३९२७ या क्रमांकाच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली.

या कारवाईत उत्तर चाकण पोलीस ठाणे, उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे हद्दीतील चार गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी काहींना पुढील कारवाईसाठी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात, तर इतर आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.



















Join Our Whatsapp Group