पुणे (Pclive7.com):- दि शेतकरी शिक्षण मंडळ (टिएसएसएम) संचलित बावधन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शैक्षणिक संकुलास नॅक कमिटीकडून ‘अ’ श्रेणी मानांकन प्राप्त झाले. अभियांत्रिकी कॉलेजपैकी ‘अ’ ग्रेड मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज ठरले असल्याची माहिती संकुल संचालक प्रा.शशिकांत थिटे यांनी दिली.
प्राचार्य डॉ.सी.एम सेदाणी म्हणाले कि, पीव्हीपीआयटीमध्ये सुमारे दोन हजार विद्यार्थी शिकत आहे. संकुलात सिव्हिल इंजिनिअरिंग,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे चार अभियांत्रिकीचे कोर्सेस शिकवले जाते.
शंभरहून अधिक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले. १५५ पेटंट प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळविले. विद्यार्थ्यांचे ७५० शोधनिबंध प्रकाशित, आंतरराष्ट्रीय स्तरावर ३ पुस्तके प्रकाशित झाले. पीव्हीपीआयटी ने मलेशियन व युरोपियन विद्यापीठासोबतच सामंजस्य करार केले. उच्चविभूषित प्राध्यापक वर्ग, उत्तम मूलभूत सुविधा, निसर्गरम्य वातावरणात वसलेले शैक्षणिक संकुल हे वैशिष्ट्ये आहे.
यासाठी संस्थेचे संस्थापक /सचिव तथा आमदार डॉ.तानाजी सावंत, शेतकरी शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. गिरिराज सावंत, जेएसपीएमचे विश्वस्त प्रा.ऋषीराज सावंत यांचे प्रोत्साहन आणि अमुल्य मार्गदर्शन लाभले.
पीव्हीपीआयटी बावधन संकुल संचालक प्रा. शशिकांत थिटे, प्राचार्य सी.एम.सेदाणी, समन्वयक स्थापत्य आभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. रविराज सोरटे आणि यांत्रिकी आभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ.कमलेश सोरटे, डॉ. बी.के सरकार, डॉ. राजेंद्र कानफाडे, डॉ. के.के बोरगावकर, प्रा. पी एम बोराडे, डॉ. डी.एम ढाणे, डॉ.विकास फरांदे यांनी मानांकन मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group