पिंपरी (Pclive7.com):- गेल्या पंधरा, वीस वर्षात पिंपरी चिंचवडचा खऱ्या अर्थाने विकास राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला. आता संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्याची मला संधी द्या असे आवाहन पार्थ पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. हॉटेल शिवार गार्डन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितलताई नाना काटे,माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, शंकर काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश भोंडवे, पिंपळे सौदागर येथील विविध सोसायटींचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन नाना काटे यांनी केले होते.
पार्थ पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडचा खऱ्या अर्थाने विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे. शरद पवार साहेबांनी हिंजवडी येथे आयटी हब आणल्यामुळेच मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे शहराचा ‘कायापालट’ झाला आहे. त्याप्रमाणेच मला संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे रहा अशी साद घालत मावळमधून काम करण्याची संधी द्या असे आवाहन पार्थ पवार यांना यावेळी केले.






















Join Our Whatsapp Group