पिंपरी (Pclive7.com):- स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे पीएमपीएमएलची बस थेट रस्ता दुभाजकात घुसून अपघात झाला. दापोडी येथील सँडविक कंपनीसमोर आज दुपारी ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
कात्रजहून निगडीच्या दिशेने जाणारी पीएमपीची बस दापोडी येथील सँडविक कंपनीसमोर आली असता बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बसचे स्टेअरिंग अचानकपणे लॉक झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट बीआरटी मार्गातील दुभाजकाला जाऊन धडकली. दरम्यान बस बंद पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
या अपघातात बसचे नुकसान झाले असून कोणीही जखमी झाले नाही. बसमध्ये अचानकपणे झालेल्या अशा तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐंरणीवर आला आहे.






















Join Our Whatsapp Group