पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडीतील यशवंत प्राईड या इमारतीची सीमा भिंत अचानकपणे कोसळून शेजारी असलेल्या घरातील एक ६ वर्षाचा मुलगा या भिंतीखाली अडकला आहे. लोकेश ठाकूर असं मुलाचं नाव आहे.

या मुलाला बाहेर काढण्याचे अग्निशामक विभाग तसेच परिसरातील नागरिकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ही भिंत अचानक कोसळल्याने तीन जण भिंती खाली अडकले होते. त्यापैकी दोघांना सुखरूपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक चार वर्षाचा मुलगा या भिंतीखाली अडकला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्याला या भिंती खालून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
( सविस्तर वृत्त लवकरच)






















Join Our Whatsapp Group