हिंजवडी (Pclive7.com):- अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई बेंगलोर हायवेवरील बावधान जवळील टोयोटा शोरुम समोर घडली.
भिमराव विठ्ठल कांबळे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रोहीत ओव्हाळ (वय २३, रा बाणेर) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.२ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी रोहीत याचे मामा भिमराव हे त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच/११/झेड/०१४३) वरुन मुंबई बेंगलोर हायवेवरील बावधान जवळील टोयोटा शोरुम समोरुन जात होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने भिमराव यांना जोरदार धडक दिली. यामध्ये भिमराव यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रोहित याने रविवारी (दि.५) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हिंजवडी पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.






















Join Our Whatsapp Group