तळेगाव (Pclive7.com):- तळेगाव टोल नाका येथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंड येथील ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम आज मंगळवार दि. 14 रोजी सकाळी 10 ते दुपारी सव्वा चार वाजेपर्यंत चालू राहणार आहे. प्रत्येक तासाला पंधरा मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये हे काम चालणार असून पहिल्या टप्प्यात मंगळवार दि. 14 मे ते शुक्रवार दि. 17 मे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवार दि. 21 मे ते गुरुवार दि. 23 मे दरम्यान हे काम चालणार आहे. वरील तारखेला प्रत्येक तासाला पंधरा मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. एक्सप्रेसवे पासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दरम्यान उर्से खिंड येथून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी तसेच आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभागाकडून करण्यात आले आहे.
वाहतूक बंद ठेवण्यात येण्याची वेळ पुढील प्रमाणे
सकाळी – १० ते १०.१५, ११ ते ११.१५
दुपारी – १२ ते १२.१५, १ ते १.१५, २ ते २.१५, ३ ते ३.१५
संध्याकाळी – ४ ते ४.१५






















Join Our Whatsapp Group