पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथे तीन मुलांना गळफास लावून स्वतः महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गळफास लावलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. वडिलांनीच अत्याचार केले असल्याने आईने ही टोकाची भूमिका घेतली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही घटना आज (रविवार) सायंकाळी उघडकीस आली. नऊ, सात आणि सहा या तीन मुलांना आईने गळफास लावून मारले. त्यांतर स्वतः महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार नेमका कश्यामुळे झाला असावा याचा काहीच तपास लागत नव्हता. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार मृत्यू झालेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. अत्यचार कोणी केले आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र वडिलानीच अत्याचार केले असावेत, हा प्रकार समजल्यानंतर आईने टोकाची भूमिका घेतली असावी. तिन्ही मुलांना गळफास लावून त्यांचे जीवन संपवले आणि त्यांनंतर स्वताही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तपास भोसरी पोलिस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group