पिंपरी (Pclive7 com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या तीनही बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाचे अमित गोरखे, भीमा बोबडे यांच्यासह आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. महायुतीच्या या तीनही बंडखोरांनी आज माघार घेतली आहे. महायुती शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबकस्वार यांना या सर्वांनी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राजू दुर्गे, अमोल थोरात, बबलू सोनकर, माधव मुळे आदी उपस्थित होते.