पिंपरी (Pclive7.com):- नोटबंदी व जीएसटीमुळे व्यापारी देशोधडीला लागले आहेत. अनेक उद्योग, व्यापार बंद पडण्याच्या बेतात आहेत. या व्यवसायांवर अवलंबून असलेले हजारो कामगारही बेकार झाले आहेत. व्यापारी व कामगार शिवसेना-भाजप युतीला निश्चित धडा शिकवतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांनी येथे केले.
पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ पिंपरी कॅम्प परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आसवानी बोलत होते. या पदयात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका उषा वाघेरे, निकीता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, जगन्नाथ साबळे, माजी नगरसेविका शांती सेन, रेश्मा कांबळे, पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे, पीसीएमटीचे माजी चेअरमन संतोष कुदळे, उद्योजक विजय आसवानी, राजू आसवानी, अनिल आसवानी, युवा नेते ऋषीकेश वाघेरे, संतोष वाघेरे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिला व युवा वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता. पदयात्रेला ठीकठिकाणी मोठा प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी बनसोडे यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या. अण्णा दादू बनसोडे यांना घड्याळ समोरील बटन दाबून प्रचंड बहूमतानी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी डब्बू आसवानी म्हणाले की, देशात जेव्हा मंदीची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी योग्य उपाय योजना करून देशाला यातून बाहेर काढले. आज मात्र, नोटबंदी व जीएसटी मुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. देशातील हजारो उद्योग बंद पडले आहेत. कामगार देशोधडीला लागले आहेत. पिंपरी कॅम्प ही व्यवसायाची बाजारपेठ आहे. मात्र, व्यापा-यांवर रडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे व्यापारी व कामगार शिवसेना, भाजप युतीला निश्चित धडा शिकवतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांनी केले.