लोणावळा (Pclive7.com):- पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर ओव्हरग्रेड गँन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आज बुधवार ( दि.२३) दुपारी १२ ते २ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या दोन तासांच्या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत सर्वच प्रकारची अवजड व मालवाहतूक करणारी वाहने खालापूर व कुसगाव टोलनाक्याच्या अलीकडे थांबविण्यात येणार आहेत. तर हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत.