पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी प्रभागाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रत्यक्ष संबंधित अधिकारी व त्यांचे सहायक अधिकारी यांच्या समवेत प्रभागाची पाहणी केली. यावेळी प्रभाग क्रमांक २१ मधील स्थापत्य विभागाचे श्री.मोमीन, ड्रेनेज विभागाचे श्री. मोने व श्री.मगर तसेच पाणीपुरवठा विभागाचे श्री.शेमले, व त्यांचे सहायक अधिकारी हेही होते. याच बरोबर प्रभागात बंद पडलेल्या ४३ एलईडी विद्युत दिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी संदीप वाघेरे यांनी विद्युत विभागाकडे केली होती. त्याची दखल घेत विद्युत विभागाने तात्काळ सर्व नादुरुस्त दिव्यांची दुरुस्ती केली आहे. तसेच तपोवन मंदीर रोड ते अशोक थिएटर भागातील अनेक दिवसांपासून रखडलेली पाण्याची ग्रॅविटी लाईन टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. प्रभागातील अनेक भागामधील जुने पेव्हिंग ब्लॉक उखडले गेले होते. याची तात्काळ दखल घेत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी त्याठिकाणी नवीन पेव्हिंग ब्लॉक बसविले. प्रभागातील नवमहाराष्ट्र विद्यालय, ‘ड’ प्रभाग शाळा व अनुसया नामदेव वाघेरे शाळेच्या क्रीडांगण दुरुस्तीचे काम तसेच मनपाचे विद्यानिकेतन प्राथमिक शाळेतील रंगरंगोटी करण्याचे ही काम वाघेरे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात वाढत्या तक्रारी व कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक वाघेरे यांनी महापालिकेच्या सफाई अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
पिंपरीगाव तसेच कॅम्प परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भातही नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून त्याअनुषंगाने प्रभागातील नादुरुस्त रस्त्यांची तसेच रस्त्यावरील खड्ड्यांचीही डागडुजी करण्यात आली आहे. प्रभागातील शिवाजी महाराज पुतळा ते जिजामाता हॉस्पिटल, तपोवन मंदिर रोड ते अशोक थिएटर, वाघेरे पार्क, गणेश हॉटेल ते अशोक थिएटर, शनि मंदिर ते शास्त्री गार्डन, ग्रीन पार्क हॉटेल समोरील रस्ता, डेअरी फार्म ते रेजिस्टर ऑफिस, नंदकुमार जाधव गार्डन समोरील रस्ता, प्रश्वास सोसायटी समोरील रस्ता, ज्ञा नेश्वर नागरी येथे स्त्रॉंम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचे काम तर माळी आळी, जाधव कॉलनी, वैष्णव देवी मंदिर परिसर, शास्त्री गार्डन मागील रस्ता ते गेलार्ड चौक, सी-ब्लॉक ९ व १०, ओबाडा धर्म शाळा बालामल चाळ, समृद्धी हॉटेल ते पिंपळे सौदागार ब्रिज, न्हावी आळी ते कापसे आळी, शिंदे आळी, वाघेरे आळी, कापसे आळी, पवनेश्वर मंदिर परिसर अशा प्रभागातील अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाची नियोजित कामे करण्यात येणार आहेत. वैभवनगर ते काळेवाडी ब्रिज येथील १५ मी रस्ता, अभिमन्यु चौक ते वैभवनगर १८ मी रस्ता, जनसंपर्क कार्यालय ते अभिमन्यु चौक १८ मी रस्ता, अशोक थिएटर ते बालगोपाळ शाळेपर्यंतचा १२ मी रस्ता तसेच वाघेरे पार्क ते हेमू कलानी परिसर, जयका हॉटेल ते साई चौक पर्यंतचा रस्ता विकसित करण्याचे काम, रस्त्याच्या कडेने फुटपाथ विकसित करणे तर आवश्यक त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याच्या ही सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभागातील भैरवनाथ मंदिर व छञपती शिवाजी महाराज पुतळा तसेच मनपा शाळांतील किरकोळ दुरुस्त्या व रंगरंगोटीची कामे आशा सर्व कामांच्याबाबतही वाघेरे यांनी जातीने लक्ष देत ही कामे मार्गी लावण्याचा सपाटा प्रभागात लावल्यामुळे पिंपरी प्रभागातील नागरिकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.