पिंपरी (Pclive7.com):- नुकत्याच झालेल्या इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित सीए फाऊंडेशन परीक्षेत गरवारे कॉलेजची विद्यार्थिनी आदिती धनाजी मोझर ही प्रथम श्रेणीत उतीर्ण झाली आहे.
आदिती हिला एकात्मक ॲकडमीचे संचालक प्रा. अभिषेक झावरे, गरवारे कॉलेजच्या प्राचार्या बिराजदार मँडम यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले. भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे व्यवस्थापक धनाजी मोझर यांची आदिती ही कन्या आहे.
आदितीचे सीए फाऊंडेशन परीक्षा उतीर्ण झाल्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते, उपाध्यक्ष मनोज बोरसे, सीओ गजानन कुलकर्णी, जेष्ठ संचालक ॲड. घनश्याम खलाटे, पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटशेठ ओस्तवाल, माजी अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण चोरबिले, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सरचिटणीस संजय बोरा आदींनी आदितीचे मनापासून अभिनंदन केले.






















Join Our Whatsapp Group