पिंपरी (Pclive7.com):- कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवसाचे लॉकडाउन सुरु झाल्याने नागरिक कुटुंबसहीत घरातच आहे. गेले आठ दिवसापासून युवासेना पिंपरी विधानसभा व आशीर्वाद महिला बचत गटाकडून जिल्हा संघटिका सुलभा उबाळे ह्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून गोरगरीब नागरिक, विद्यार्थी ह्यांना मोफत भोजनचा कार्यक्रम चालू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य जबाबदारींने पार पाडत आहे. आज दापोडी -फुगेवाडी मधील सर्व सफाई कामगार ना मोफत भोजन वाटप करण्यात आले. ह्यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला गटाच्या शीला जाधव, रोहित गोरे, रमेश तात्या जगताप, महेश बोधले, अंजन बंगारी आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group