पिंपरी (Pclive7.com):- आझाद स्पोर्टस् क्लब मित्र मंडळच्या वतीने काळेवाडी पोलिस चौकीत मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनोद नढे, गजानन नढे, अतुल नढे, काळुराम नढे, विनोद तापकीर, महेश शिंदे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत काळेवाडी येथील आझाद स्पोर्टस् क्लब मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. काळेवाडी पोलीस चौकीत तसेच जोतिबानगर परिसरातील गरजूंना मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप मंडळाच्या वतीने करण्यात आले.























Join Our Whatsapp Group