पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या रूग्णांत वाढ सुरूच सुरूच आहे. शहरातील पिंपळे सौदागर, दिघी, वाल्हेकरवाडीसह पिंपरी परिसरातील ५ जणांचे रिपोर्ट आज (दि.२१) ‘पॉझिटीव्ह’ आलेत. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २४५ वर पोहचला असून १४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, कोरोनामुळे १६ जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागानेेे दिली आहे.
महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील ५ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आहेत. त्यामध्ये २५, ३२, ३५ वर्षीय पुरुष आणि २९, ६५ वर्षीय दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईतील रहिवासी पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, मोशी, जुनी सांगवी, चिखली येथील ४ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महापालिका रुग्णालयात ८० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील २४५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील १६ बाधित रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील ७ आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या ९ अशा १६ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.























Join Our Whatsapp Group